यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचोली गावात राहणाऱ्या एका तरूणीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असुन ,तिला उपचारार्थ जळगाव येथील रुग्णालयात दाखत करण्यात आले आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की , यावल तालुक्यातील चिंचोली येथील राहणारी राणी संजय सोळुंखे (वय१९ वर्ष) हिने आपल्या राहत्या घरात सकाळी १० ते ११ वाजेच्या दरम्यान काही विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तरूणीने| विष प्राशन केल्याचे कळताच गावातील नागरीकांनी तिला तात्काळ किनगाव येथील प्राथमीक आरोग्य केन्द्रावर उपचारासाठी नेले असता तिथ उपचार करण्याकरिता कुणीही सक्षम अधिकारी नसल्याचे सांगण्यात आले. आज महाशिवरात्रीची शासकीय सुटी असली तरी वैद्यकीय अधिकारी यांना मुख्यालय सोडता येत नाही असे शासन आदेश आहे. परंतु, शासनाच्या या आदेशाला केराच्या टोपलीत टाकुन व शासनाचे नियम व आदेश धाब्यावर ठेवुन वैद्यकीय अधिकारी हे सुटीची संधी पाहुन रुग्णालयातुन गायब असल्याचा आरोप नागरिकांडी केला आहे. किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ एकमात्र वैद्यकिय कर्मचारी यांनी तरुणीची प्रकृती पाहुन तात्काळ जळगावे घेवुन जाण्याच्या सूचना दिल्या असून तिला जळगाव येथे दाखल करण्यात आले आहे. राणी सोळुंखे ही तरूणी एफवायबीएच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असल्याचे वृत्त असुन तिने आत्महत्याचा मार्ग का अवलंबला याची माहीती मात्र अद्याप तरी मिळु शकली नाही.