*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी|* तालुक्यातील चिंचगव्हाण- सुंदरनगर येथे सुरू असलेल्या अंगणवाडीच्या बांधकामाला गेल्या चार महिन्यांपासून ठेकेदारांनी अचानक ब्रेक लावले आहे. त्यामुळे तात्काळ कामाला सुरुवात न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
तालुक्यातील चिंचगव्हाण- सुंदरनगर येथे जिल्हा परिषद अंतर्गत बाल कल्याण विभागामार्फत नवीन अंगणवाडीचे बांधकाम सुरू आहेत. मात्र गेल्या चार महिन्यांपासून ठेकेदारांनी अचानक कामाकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे सदर बांधकामाला ब्रेक लागले आहेत. त्यामुळे तातडीने बांधकामाला सुरुवात न झाल्यास पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रतिनिधींशी बोलताना दिला आहे. दरम्यान प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व ठेकेदारांच्या नाकर्तेपणामुळे हे विदारक चित्र असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. तत्पूर्वी बंद कामात बांधकामांच्या सिमेंटच्या भिंतीला पाणी दिला जात नाही. तसेच ठेकेदार बांधकामाच्या ठिकाणी येऊन ढूंकुनही पाहत नाही अशा विविध प्रकारच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सदर काम हे तातडीने सुरळीत चालू करावे अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे. सदर बांधकामांवर प्रशासनाने जातीने लक्ष ठेवावे असेही यावेळी सांगण्यात आले.