Home क्राईम चाळीसगाव शहरातून दोन गायी चोरीला

चाळीसगाव शहरातून दोन गायी चोरीला


चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | घराच्या मागील गोठ्यात बांधलेल्या बारा गायींमधून दोन गायी अज्ञाताने चोरून नेल्याची घटना शहरातील धुळे रोडवर घडली आहे. याप्रकरणी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील धुळे रोड परिसरात राहणारे संतोष निंबा घटी हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्याला आहे. चालकातून व दुग्ध व्यवसायातून ते आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवित असतात. तत्पूर्वी घटीने घराच्या पाठीमागे जणावरांसाठी एक गोठा बांधला आहे. त्यात एकूण १२ बारा गायी आहेत. मात्र २५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपासून तर २६ डिसेंबर -२०२२ रोजी सकाळी ३ वाजेच्या दरम्यान अज्ञाताने २५ हजार रुपये किं.ची जर्सी जातीची गाय व २० हजार रुपये किं.ची लाल पांढऱ्या रंगाची जर्सी जातीची गाय अशा ४५ हजार रुपये किं.ची दोन गायी चोरून नेली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून मुलगा शंतनु संतोष घटी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.


Protected Content

Play sound