चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील डोन येथील ७५ वर्षीय संशयित कोरोना वृध्दाचा मृत्यू झाला आहे. चाळीसगाव येथील अंधशाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. मयत झालेल्या वृध्दाचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. या घटनेमुळे गावाती भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील डोन येथील ७५ वर्षीय वृध्दाला कोरोनाची लक्षणे जाणवू लागेल्याने चाळीसगाव येथील अंधशाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. आज संशयित कोरोना वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तहसीलदार, प्रांत व पोलिस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्वॅबचे नमुने घेण्याचे काम सुरू असल्याचे तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. बाविस्कर यांनी सांगितले. सोबत त्याचबरोबर त्यांचा मृतदेह अत्यंत काळजीपूर्वक सर्व सोपस्कार पूर्ण करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे.