जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ऊसतोडणीसाठी कामाला मजूर पाठविण्याचे सांगून चाळीसगाव येथील शेतकऱ्याला शिरसोली येथील १२ जणांनी ३ लाख ६० हजार रूपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शनिवारी १९ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव कृष्णनगर तांडा येथील जगदीश किसन खरात (वय-३७) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ऊस तोडणीच्या कामाचा ठेका घेतात. शिरसोली येथील अर्जून भिमा जाधव यांला मजूरासाठी प्रत्येक ३० हजार आणि कमिशन ३० हजार असे एकुण ३ लाख ६० हजार रूपये जगदीश खरात यांनी दिली. परंतू अर्जून जाधव यांनी ऊसतोडणीला मजूर पाठविले नाही. म्हणून खरात यांनी दिलेले पैसे मागितले असता अर्जून जाधव यांच्यासह इतर १२ जणांनी जगदीश किसन खरात यांना धमकी देत पैसे देणार नाही, कामावर येणार नाही असे सांगत जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी जगदीश खरात यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अर्जून भिमा जाधव, अशोक जयसिंग भिल, रोहिदास शिवाजी भिल, गोकुळ शिवाजी भिल्ल, शिवाजी भाटू भिल्ल, राहूल अशोक भिल्ल, सुनिल महारू भिल्ल, करण उत्तम जाधव, सुकदेव सुनिल मालचे, राजू मानसिंग भिल्ल, राजेंद्र विठ्ठल मोरे आणि अनिल सुकलाल भिल्ल रा. शिरसोली ता.जि.जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.