चाळीसगाव येथील गजानन हॉस्पिटल मधील रुग्ण नाशिक येथे सापडला कोरोना पॉझिटिव्ह

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । येथील लक्ष्मीनगर भागातील गजानन हॉस्पिटल येथे चाळीसगाव नांदगाव सिमेवर असलेल्या आमोदे येथील रुग्ण गेल्या दोन दिवसांपासून छातीमध्ये दुखत असल्याच्या कारणाने उपचार घेत असताना आज अचानक त्याच्या छातीत जास्त दुखू लागल्याने त्यास डॉक्टरांनी नाशिक येथे पुढील उपचारासाठी रवाना केले असता नाशिक येथे त्याची तपासणी झाली असता तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निदर्शनास आले आहे.

आमोदे येथील रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चाळीसगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. चाळीसगाव शहरातील गजानन रुग्णालयाची देखील तपासणी होणार असल्याचे सांगितले जात आहे. आमोदे हे गाव नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असले तरी चाळीसगाव तालुक्यास अत्यंत लगत असल्याने आतापर्यंत चाळीसगाव तालुक्यात शिरकाव न झालेल्या कोरोना व्हायरसचा चाळीसगावच्या सीमेवर शिरकाव झाला असल्याने अधिक चिंता निर्माण झाली आहे. चाळीसगाव तालुक्यातील नागरिकांनी स्वतःची काळजी घेत सोशल डिस्टेंसिंग पळून आता सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Protected Content