जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अखिल भारतीय शिंपी समाजाचे २२वे अधिवेशन चाळीसगाव येथे दोन दिवशीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून या अधिवेशनास जळगाव शिंपी समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित चे आवाहन शहर अध्यक्ष राजेन्द्र कुमार सोनवणे यांनी केले आहे.
श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज अखिल भारतीय शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेचे शनिवार दि. २८ व २९ मे रोजी मध्यवर्ती संस्थेची स्थापने नंतर ६६ वर्षां पुन्हा एकदा चाळीसगाव नगरीमध्ये २२ वे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनामध्ये अनेक सामाजिक विषय ठराव पारित होणार असून यामध्ये नूतन अखिल भारतीय शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मा वनेशजी खैरनार ,महिला अध्यक्षा सुषमाताई सावळे, युवा अध्यक्ष रुपेश बागुल हे अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. या अधिवेशनासाठी जळगाव शहर शिंपी समाजाचे हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांनी आज शनिवार दि. २८ मे रोजी सकाळी ८ वाजता चाळीसगाव येथे प्रयाण केले. जळगाव शहर शिंपी समाज संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुमार सोनवणे यांच्या उपस्थितीत जय नामदेवच्या गजरात प्रयाण केले. याप्रसंगी उपाध्यक्ष विवेक जगताप ,अ. भा. उपाध्यक्ष मुकुंद मेटकर , माजी युवा अध्यक्ष मनोज भांडारकर,मा जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय कापुरे, म. का. सदस्य शिवदास सावळे, दिलीप भांबरे, मा. सचिव प्रशांत कापुरे, का. सदस्य दिलीप सोनवणे, चेतन खैरनार, जगदिश जगताप, मोहन सोनवणे, सोमनाथ बाविस्कर, गणेश सोनवणे, सुधाकर कापुरे, नंथू काका शिंपी, अ. भा. महिला आघाडी उपाध्यक्षा कुसुमताई बिरारी, शरदराव बिरारी, महेश शिंपी, सुरेश सोनवणे आदी उपस्थित होते.