चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील ग्रामीण भागातील दलितांना प्राथमिक सोईसुविधा मिळाव्यात यासाठी दलित वस्तींच्या विकासकामांसाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे ४ कोटींचा भरीव निधी नुकतीच मंजूर झाला आहे.
राज्यातल्या ग्रामीण भागातील दलित वस्त्यांच्या मूलभूत सुविधा व विकासासाठी राज्य शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सुरू केली आहे, याअंतर्गत आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने चाळीसगाव मतदारसंघासाठी ४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. दलित वस्ती विकासासाठी प्रथमच भरीव निधी मंजूर केल्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत. दरम्यान सदर कामे चांगल्या व गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी देखील पाठपुरावा करणार असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी “लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना सांगितले आहे.
पुढीलप्रमाणे मंजूर निधीचा गावनिहाय होणार काम!
१) सायगाव येथे नवेगाव मातंगवाडा येथे रस्ता सुधारणा करणे व भूमिगत गटार बांधकाम करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) १० लाख
२) दहीवद येथे दलित वस्तीत रस्ता काँक्रीटीकरण करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) १० लाख
३) दस्केबर्डी येथे दलित वस्तीत रस्ता काँक्रीटीकरण करणे. (ता. चाळीसगाव, जि.जळगाव) १० लाख
४) भऊर येथे दलित वस्तीत रस्ता काँक्रीटीकरण करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) १० लाख
५) सायगाव येथे दलित वस्तीत चौक सुशोभीकरण करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) १० लाख
६) चांभर्डी खु येथे भूमिगत गटार व रस्ता सुधारणा करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) १० लाख
७) डोनदिगर येथील दलित वस्तीतील चौक सुशोभीकरण करणे १० लाख
८) कळमडू येथे दलित स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सुधारणा करणे (ता. चाळीसगाव) १० लाख
९) देवळी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सभामंडप बांधकाम करणे २० लाख
१०) कृष्णानगर येथे दलित वस्तीत बौध्द विहाराजवळ सभामंडप बांधकाम करणे ता.चाळीसगाव २० लाख
११) करमूड येथे संत रविदास सामाजिक भवन व स्मारक बांधकाम करणे १५ लाख
१२) लोंढे दलित वस्तीत रस्ता काँक्रीटीकरण करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) १० लाख
१३) वाघळी विकासो ते दलित वस्ती कडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करणे. (ता.चाळीसगाव) १० लाख
१४) पातोंडा येथे दलित वस्तीत सुलभ शौचालय बांधकाम करणे १५ लाख
१५) वडाळा दलित वस्तीत रस्ता काँक्रीटीकरण करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) १० लाख
१६) पिंपरखेड येथे दलित वस्तीच्या स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे १० लाख
१७) पिंपळगाव येथे दलित वस्तीत रस्ता सुधारणा करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) १० लाख
१८) मेहुणबारे येथे दलित वस्तीत रस्ता सुधारणा करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) २० लाख
१९) आडगाव येथे दलित वस्ती पोहोच रस्ता सुधारणा करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) १० लाख
२०) गणेशपूर येथे दलित वस्तीत सभामंडप बांधकाम करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) १० लाख
२१) करजगाव येथे दलित वस्ती पोहोच रस्ता सुधारणा करणे. (ता. चाळीसगाव) १० लाख
२२) टाकळी प्र.चा. येथ जिजाऊ नगर कडून दलित वस्ती कडे जाणारा पोहोच रस्ता नवीन अंगणवाडी पर्यंत सुधारणा करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) १० लाख
२३) बोढरे येथे दलित वस्ती स्मशानभूमी बांधकाम व अनुषंगिक कामे करणे. (ता. चाळीसगाव) १५ लाख
२४) टाकळी प्र.दे. येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये इंदिरानगर ते सार्वजनिक शौचालय पर्यंत अंडर ग्राउंड गटार तयार करणे १० लाख
२५) टाकळी प्र.दे. येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये फुला पुंडलिक पवार यांच्या घरापासून ते मधुकर सुदाम यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसवणे १० लाख
२६) वलठाण येथे दलित वस्ती पोहोच रस्ता सुधारणा करणे. (ता. चाळीसगाव, जि.जळगाव) १० लाख
२७) उंबरखेड येथे दलित वस्ती पोहोच रस्ता सुधारणा करणे. (ता. चाळीसगाव, जि.जळगाव) १० लाख
२८) रोकडे येथे दलित वस्तीत रस्ता सुधारणा करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) १० लाख
२९) नांद्रे येथे दलित वस्तीत सभामंडप बांधकाम करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) १५ लाख
३०) शिदवाडी येथे दलित वस्तीत चौक सुशोभीकरण करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) १५ लाख
३१) शिरसगाव येथे दलित वस्तीत रस्ता सुधारणा करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) १० लाख
३२) वाघारी तांडा येथे दलित वस्ती कडे जाणारा रस्ता सुधारणा करणे. (ता. चाळीसगाव) ५ लाख
३३) राजमाने येथे दलित वस्तीत जाणारा रस्ता सुधारणा करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) ५ लाख
३४) आभोने तांडा येथे दलित वस्ती कडे जाणारा रस्ता सुधारणा करणे. (ता. चाळीसगाव) ५ लाख
३५) सुंदर नगर येथे दलित वस्ती कडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण व सुधारणा करणे. (ता.चाळीसगाव, जि. जळगाव) ५ लाख
३६) इच्छापूर येथे दलित वस्तीत सभामंडप बांधकाम करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) १० लाख
३७) चैतन्य तांडा येथे संगम गार्डन समोर दलित वस्तीत कडे जाणारा रस्ता सुधारणा करणे. (ता.चाळीसगाव, जि. जळगाव) ५ लाख
३८) वाघले (लहान वाघले तांडा ) दलित वस्तीत कडे रस्ता सुधारणा करणे. (ता.चाळीसगाव) – ५ लाख