चाळीसगाव, प्रतिनिधी | चाळीसगाव तालुका डी. जे. संघटनेच्या बैठकीत गजानन चौधरी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात करण्यात आली.
चाळीसगाव तालुका डी. जे. संघटनेच्या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड एकमताने करण्यात आली. यात अध्यक्षपदी गजानन चौधरी, उपाध्यक्षपदी निलेश पाटील व भोला गवळी, खजिनदार सुभाष आहीरे, सचिवपदी आनिल पाटील यांची निवड करण्यात आली. या बैठकीत समधान पाटील, किरण लोखंडे, संभाजी कदम, केतन गवळी, फारुख शेख, चेतन पाटील, राहुल पाटील, मुन्ना जाधव, नाना गोरे, सौरभ सोनवणे, बबलु बोरसे, मयुर धुगे, जितेंद्र खरटमल, प्रशांत राठोड, सतिष कोळी, संदिप चौधरी, अविनाश पवाणी, अन्नू पवाणी, आमोल पाटील व तालुक्यातील सगळे डी. जे. सांउड चालक मालक उपस्थित होते. बैठकीत सध्याच्या कोविड नियमानुसार डीजे रात्री ९ वा बंद करण्याचा एकमताने ठरविण्यात येवून कोविड नियमांचे कटोकरोर पालन करुन प्रशासन सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, नुतन कार्यकारिणीला आमदार मंगेश चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.