चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधीतांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर नगरपालिका व पोलिस प्रशासनाने कंबर कसली असून ५३ विना मास्क धारकांवर आज दंडात्मक कारवाई केली आहे.
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने हाहाकार माजवायला सुरूवात केली आहे. त्यात चाळीसगाव शहरांत कोरोना बाधीत रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे हि संख्या आटोक्यात आणण्यासाठी नगरपालिका व पोलिस प्रशासनाने विना मास्क धारकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारायला सुरूवात केली आहे. यावेळी एकूण ५३ विना मास्क धारकांवर दंडात्मक कारवाई करून १०,१०० रूपयांची वसूली नगरपालिकेने केली. हि कारवाई शहरातील तहसील कार्यालयासमोर विना मास्क संचार करणाऱ्यांवर करण्यात आली.
सदर कारवाई हि सपोनि सचिन कापडणीस, पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार, प्रकाश पाटील, दिपक पाटील, उमाळे, महेंद्र पाटील, शरद पाटील, समाधान पाटील व नगरपालिका कर्मचारी दिनेश जाधव, निलेश चौधरी, विनोद राजपूत, नितीन सुर्यवंशी, सुमित जाधव व पप्पू देशमुख आदींनी केली.