चाळीसगाव प्रतिनिधी । शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान, संभाजी सेना व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सध्या देशावर आणि राज्यावर कोणाचे महाभयंकर संकट आले आहे आणि त्यामुळे अनेक लोक मृत्यू मुखी पडत आहेत अनेक लोक बाधित झालेले आहेत आणि त्यामुळे आज राज्याला मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज आहे. यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आवाहन केले आहे की रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे. मुख्यमंत्री महोदयांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष श्रमीक चंद्रशेखर गोजमगुंडे यांनी महाराष्ट्रभर रक्तदान शिबिरे आयोजित करावीत असे आवाहन शिवप्रेमींना केले होते. यानुसार चाळीसगाव येथे सह्याद्री प्रतिष्ठान, संभाजी सेना व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. हे रक्तदान शिबिर जीवन सुरभी रक्तपेढीत घेण्यात आले असून सकाळी ९:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज घाटावरील शिवरायांच्या पुतळ्याला सह्याद्री प्रतिष्ठान प्रांत अध्यक्ष दिलीपभाऊ घोरपडे यांच्या हस्ते माल्यार्पण करून रक्तदान शिबिर सुरू करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे प्रांताध्यक्ष दिलीप घोरपडे यांनी स्वतः रक्तदान करून केले. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे मावळे आणि संभाजी सेनेच्या संभाजी सैनिकांनी रक्तदान केले. शिवाय शहर व तालुक्यातील इतरही अनेक राष्ट्रप्रेमी देश प्रेमी शिवप्रेमींनी उस्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी १११ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र चे शुभम चव्हाण, गजानन मोरे,जितू वाघ,सचिन पाटील, दिगंबर शिर्के योगेश शेळके, दीपक राजपूत,विनोद शिंपी, दीपक पवार, सुनील साळुंखे प्रकाश नायक,अरुणा घोरपडे, प्राजक्ता घोरपडे, शितल पवार,सुरेखा गुंजाळ, भारती गुंजाळ, पप्पू पाटील, संजय पवार, मोहन भोळे, दिनेश घोरपडे, सचिन घोरपडे, अजय घोरपडे, विकी राठोड, पितांबर कोळी, भरत निकम, सागर अहिरे, गौरव घोरपडे, अरविंद घोरपडे, हेमंत भोईटे, रवींद्र दुसिंग, संभाजी पाटील, टोनी पंजाबी, संभाजी सेना चाळीसगाव चे गिरीश पाटील, अविनाश काकडे, सुनील पाटील, प्रवीण पाटील,सुरेश तिरमली,विजय देशमुख,बंटी पाटील, कृष्णा गवळी,ऋषिकेश जाधव, अजय काकडे, हेमराज जगताप, सचिन जाधव,मच्छिंद्र कोळी, नामदेव पाटील, पप्पू मिस्तरी, लक्ष्मण बनकर,पिंटू पाटील, अमोल पाटील, कृष्णा पाटील,सुनील ठाकूर,अमर भोई; शिवसेनेचे महेंद्र पाटील रोहिदास पाटील. नाना कुमावत. भिमराव खलाने आदी उपस्थित होते. जीवन सुरभी ब्लड बँकेचे डॉक्टर दत्ता भदाणे आसिफ भाई. उमेश खेडकर. प्रियंका जगताप हरीश बारगळ. कुणाल बुंदेलखंडी. हर्षल पाटील. हर्षल पगार. नरेश पाटील यांनी शिबिर करून घेण्यात मेहनत घेतली.