चाळीसगाव: प्रतिनिधी । सर्वोच्च न्यायालयाने इतर मागास प्रवर्गाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण रद्दबातल केले हे आरक्षण वाचवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याने भाजपातर्फे चक्काजाम आंदोलन सिग्नल चौक येथे करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध केला ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजात असंतोष पसरला आहे. न्यायालयाने एका वर्षात इतर मागास प्रवर्गाची जनगणना करण्याचे निर्देश दिले होते. मात्र महाविकास आघाडीने याकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप चक्का जाम आंदोलनदरम्यान भाजपकडून करण्यात आला
राज्य सरकार सपशेल अपयशी ठरल्याची घणाघाती टीकाही यावेळी भाजपाने केली. आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की ओबीसी समाजाचे आरक्षण टिकवण्यात राज्य सरकारला अपयश आले हा ओबीसी समाजावर अन्याय आहे. त्यामुळे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल करून तमाम ओबीसीना आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. अन्यथा मुंबईला येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीसमोर आडवे पडून आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला राज्य सरकारने १०० कोटींची वसूली करण्याकडेच लक्ष केंद्रित करू नये असा टोलाही आमदार मंगेश चव्हाण यांनी नाव न घेता लगावला
यावेळी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व ओबीसी बांधव उपस्थित होते. भाजपा तालुका उपाध्यक्ष के. बी. साळुंखे, उद्धवराव माळी, प्रेमचंद खिवसरा, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, पंचायत समिती गटनेते संजय पाटील, नगरपालिका गटनेते संजय पाटील, नगरसेविका विजया प्रकाश पवार, नगरसेविका विजया भिकन पवार, विश्वास चव्हाण, नगरसेवक चिराग शेख, चंद्रकांत तायडे, नितीन पाटील, माजी जि. प. सदस्य शेषराव पाटील, अभिषेक मोरे, माजी पंचायत समिती सदस्य जगन्नाथ महाजन, अमोल नानकर, जितेंद्र वाघ, तालुका सरचिटणीस धनंजय मांडोळे, गिरीश बराटे, अमोल चव्हाण, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील पवार, शहराध्यक्ष भावेश कोठावदे, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सर्व नगरसेवक, भाजपा ओबिसी मोर्चा तालुकाध्यक्ष निलेश पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.