चाळीसगावात धाडसी चोरी; घरातील साडे तीन लाखांचा ऐवज लंपास!

चाळीसगाव,प्रतिनिधी| दिवाळी निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या दाम्पत्याच्या बंद घरातील लाकडी कपाटातून सोने चांदी व रोकड असे ३ लाख ६४ हजार रुपये अज्ञाताने चोरून नेल्याची धक्कादायक घटना शहरातील छायादीग्राम भागात उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

 

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील छायादीग्राम भागात राहणारे अविनाश फकिरराव चव्हाण (वय-४०) हे दिवाळी निमित्ताने शनिवार, ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घराला कुलूप लावून आपल्या परिवारासह नातेवाईकांकडे गेले. मात्र रविवार रोजी सायंकाळी ५ वाजता ते आपल्या घरी परतल्यावर स्वयंपाक गृहाच्या मागील लोखंडी दरवाजाचे आतील कुलूप तोडलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यावर अविनाश चव्हाण यांनी वरच्या मजल्यावरील लाकडी कपाटाची पाहणी केली असता ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोने चांदी व रोकड असे एकूण ३ लाख ६४ हजार पाचशे पन्नास रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अविनाश फकिरराव चव्हाण यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.

Protected Content