चाळीसगाव प्रतिनिधी । पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, किरण नंदलाल रोजेकर (वय-३५) रा. पाटणादेवी रोड, अदित्यनगर यांची (एमएच १९ बीएक्स ०५४४) क्रमांकाची बजाज प्लॅटीना दुचाकी हॉटेल दयानंद समोर २४ जून रोजी लावली. दुपारी ३ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुचाकली लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी शोधाशोध केला असता मिळून आली नाही. किरण रोजेकर यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुरनं १९६/२०२० प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. पो.नि. विजयकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ धर्मराज पाटील करीत आहे.