चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरातील पातोंडा येथील ५८ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यावर एकाने चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील पातोंडा येथील नाना माणिक शिरसाठ (वय-५८) हे घरासमोर दुचाकी उभी करत असताना सागर मनोहर शिरसाठ यांनी त्याच्या खिशातून चाकू काढून नानांच्या डोक्याच्या मध्यभागी वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना उघडकीला आली आहे. दरम्यान पत्नी व आई हे भांडण सोडविण्यासाठी आले असता मनोहर रामदास शिरसाठ यांनी जिवे ठार मारण्याची धमकी दिली. हि घटना १२ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात नाना माणिक शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून सागर मनोहर शिरसाठ, मनोहर रामदास शिरसाठ, लताबाई रामदास शिरसाठ व सोनाबाई रामदास शिरसाठ सर्व रा. पातोंडा ता. चाळीसगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.