*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | तालुक्यात अवकाळी पावसाने काल मध्यरात्रीपासून अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार आगमन केले आहे. या अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना जबर बसणार आहे.
चाळीसगाव तालुक्यात काल मध्यरात्रीपासून अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाले आहे. या अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान तालुक्यात शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली आहे. ती आता उपसनीवर आहे. मात्र या अवकाळी पावसामुळे भावांत मोठ्या प्रमाणात बदल होणार असून याचा जबर तडाखा तालुक्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागणार आहे.