चाळीसगावच्या व्ही.एच.पटेल विद्यालयाची सहल उत्साहात

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या व्ही. एच. पटेल प्राथमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल शुक्रवार रोजी उत्साहात संपन्न झाली. नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथील प्राचीन शनिमंदिराला भेट देऊन मौजमस्तीसह भोजणासह आस्वाद घेतला. या सहलीत पहिली व दूसरीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

नांदगाव तालुक्यात नस्तनपूर येथे प्राचीन शनिमंदीर आहे. हे मंदिर देशातील साडेसात पिठांपैकी पूर्ण तर प्रभू श्रीरामानं स्थापित केलेल्या साडेतीन पीठांपैकी देखील पूर्ण पीठ मानले जाते. गेल्या काही वर्षात मंदीर परिसराचा जीर्णोद्धार करुन अनेक विकासकामे साकारण्यात आली आहे. त्यामुळे धार्मिक व पर्यटन क्षेत्र म्हणून या तीर्थक्षेत्राचे महत्व वाढले आहे. मंदीर व्यवस्थापन पाहण्यासाठी ट्रस्ट असून अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध उद्योगपती व चाएसोच्या मॕने. बोर्डाचे चेअरमन नारायणभाऊ अग्रवाल हे काम पाहतात.
सकाळी आठ वाजता मुख्याध्यापक नाना मोरे यांनी श्रीफळ वाढवून सहलीच्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. मंदिर परिसरात असणा-या उद्यानात विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. वनभोजनही झाले. शिक्षिका त्रिशला निकम यांनी बालगीते सादर करुन विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. सहल यशस्वीतेसाठी सुजाता मोरे, जिजाबराव वाघ, अजय सोमवंशी, सचिन चव्हाण, अनिल महाजन, प्रशांत महाजन, राजश्री शेलार, मनिषा सैंदाणे, शर्वरी देशमुख, ज्योती कुमावत, कविता साळुंखे, रेखा चौधरी, सचिन पाखले, रेश्मा स्वार आदिंसह मदतनीस अर्चना कदम, पुष्पा पाटील, दत्तात्रय गवळी यांनी परिश्रम घेतले.

*आंतरराष्ट्रीय पौष्टीक धान्य वर्षानिमित्त दिली माहिती*

यावेळी मंदिर परिसरात नाशिक विभागाचे कृषी संचालक वाघ यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टीक धान्य वर्षानिमित्त पौष्टीक धान्याची माहिती दिली. जंकफूड ऐवजी ज्वारी, बाजरी, भगर, नाचणी आदि धान्य खाण्याचे त्यांनी आवाहन केले. विद्यार्थ्यांसह शिक्षकांशीही त्यांनी याबाबत संवाद साधला. ज्वारी, बाजरीचे कणीस दाखवून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिजाबराव वाघ यांनी केले.

Protected Content