जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील फुले मार्कट परिसरात बाजार खरेदीसाठी आलेल्या तीन महिलांच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने मोबाईल व रोकड चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार ३० एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास शहरातील फुले मार्केट ते दाणा बाजार परिसरात नलिनी राजधर पाटील (वय-६०) रा.द्वारका नगर जळगाव या बाजार खरेदीसाठी आलेल्या होत्या. दरम्यान, त्यांच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने २० हजार रूपयांची रोकड लांबविली. त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतू कुठेही माहिती ना मिळाल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार देण्यासाठी गेल्या असता. इतर महिलांच्या देखील रोकड व मोबाईल लांबविल्याचे समोर आले आहे. यात लिना तडवी यांचे ७०० रूपये , संगीता येवले यांचे रोकड आणि मोबाई असा एकुण ३ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल चोरला गेला तर वैशाली गुरूचरण सुर्यवंशी यांचे ४ हजार ५०० रूपयांची रोकड याप्रमाणे चारही महिलांचे एकुण ३२ हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत शनिवारी ३० एप्रिल रोजी सायंकाळी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाहीत राजकुमार चव्हाण करत आहे.