जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सिंधी कॉलनीतील डायमंड हॉल जवळ चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिला जखमी झाल्याची घटना मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी बुधवारी ३० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्नेहा परेश पुराणिक (वय-२८) रा. गणेश नगर, जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला असून खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास स्नेहा पुराणिक यांची आई पुजा तलरेजा या त्यांची दुचाकी (एमएच १९ डी २५८५) ने शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील डायमंड हॉल येथे आल्या होत्या. त्यावेळी दुचाकीजवळ पुजा तलरेजा ह्या उभ्या असतांना समोरून दुध वाटप करणारी चारचाकी क्रमांक (एमएच ०५ आर ७५८०) ने जोरदार धडक दिली. या धडकेत पुजा तलरेजा या किरकोळ जखमी झाल्या तर वाहनाचे नुकसान केले. याप्रकरणी बुधवारी ३० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता स्नेहा पुरानिक यांनी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चारचाकी वाहन चालक पांडूरंग सुकदेव मेढे रा. पिंप्राळा हुडको, जळगाव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक राजेंद्र उगले करीत आहे.