चाकूचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लांबविले

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रस्त्याने मॉर्निंग वाक करण्यासाठी निघालेल्या दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत सोन्याचे मंगळसुत्र जबरी लांबविल्याची घटना अमळनेर शहरात घडली आहे. याप्रकरणी रविवारी १४ मे रोजी सकाळी ११ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अमळनेर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील सानेगुरूजी हौसिंग सोसायटीत रंजनाबाई रामालाल पाटील (वय-५७) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १४ मे रोजी सकाळी सव्वा चार वाजेच्या सुमारास पाटील दाम्पत्य हे मॉर्नींग वाक करण्यासाठी घराबाहेर पडले. अमळनेर ते धुळे रोडवरील आर.के. नगर गेटजवळून जात असतांना अज्ञात चार जण कारमध्ये आले. तोंडाला रूमाल बांधून दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून रंजनाबाई पाटील यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत जबरी हिसकावून  घेवून पसार झाल्याची घटना घडली. महिलेचे पतीसह अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सकाळी ११ वाजता अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख करीत आहे.

Protected Content