पुणे वृत्तसंस्था । चाकण औद्योगिक वसाहतीतील इमारतीमध्ये कोरोनाची लक्षण असणाऱ्या व दोन खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. या खासगी रुग्णालयाशी जिल्हा परिषदेमार्फत करार करण्यात आला आहे. आजपासून चाकणमधील तीन रुग्णालय मोफत उपचार सुरू करण्याचे आदेश प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिले आहेत.
जिल्हा परिषदेमार्फत महाळुंगे येथे 1408 बेडचे रुग्णालय उभारण्यात आले असून या रुग्णालयात कोरोनाची लक्षणे असणाऱ्या 100 रूग्णांवर उपचार करण्याची तयारी करण्यात आली आहे. यासाठी डॉक्टरांसह वैद्यकीय अधिकारी नर्स, प्रयोगशाळा तज्ज्ञ असा 40 आरोग्य कर्मचाऱ्यांचा स्टाप देण्यात आला आहे. तीन रुग्णवाहिका सज्ज करण्यात आल्या आहेत. सध्या या रुग्णालयात शंभर रुग्णांवर उपचार केले जाणार असून चाकणमधील दोन खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली.खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तालुक्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. स्थानिक पातळीवर कोरोना रुग्णांवर तातडीने उपचार मिळण्यासाठी जिल्हा परिषद व महसूल यंत्रणा यांच्या प्रयत्नातून चाकणमध्ये तीन रुग्णालयातून उपचार दिले जाणार आहेत. पुढील काळात या रुग्णालयांची क्षमता वाढविण्यात येणार असल्याचे तेली यांनी सांगितले.