नाशिक : प्रतिनिधी । जिल्ह्यातील चांदवड येथील उप जिल्हा रुग्णालयात रुग्णाकडे अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या वैद्यकीय अधीक्षकांसह संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे
उपजिल्हा रुग्णालय परिसरात कोविड सेंटर येथे कै अरुण माळी (रा खंडाळवाडी ता चांदवड ) हे उपचार घेणेसाठी आले असताना या रुग्णास श्वसनाचा मोठ्या प्रमाणात त्रास होत होता, त्याची पत्नी वैद्यकीय अधिकाऱ्यांना विनवणी करीत होत्या की पतीस ऍडमिट करून घ्या मात्र येथे बेड शिल्लक नाही त्यामुळे त्यांना हात लावू शकत नाही असे सांगण्यात आले
.
या रुग्णास इतरत्र कुठेही संदर्भित करण्यात आले नाही किंवा रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली नाही, त्यामुळे अत्यंत असहाय परिस्थितीमध्ये तो रुग्ण दगावला . या प्रकारास वैद्यकीय अधीक्षक जबाबदार असून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते संदीप उगले, पांडुरंग भडांगे, आबा गांगुर्डे, उमेश जाधव, विकी गवळी, सोमनाथ जाधव, राजाभाऊ अहिरे, प्रकाश शेळके, अशोक हिरे आदींच्या सह्या आहेत.