जळगाव (प्रतिनिधी) चांगल्या पोलिस ठाण्यात बदलीसाठी लागणारे १५ लाख रुपये माहेरून आणावे, म्हणून पत्नीचा शारीरिक तसेच मानसिक छळ केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या पती विरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात पिडीत पत्नीने फिर्याद दिली आहे.
पिडीत विवाहिता योगिता वानखेडे (रा.नाशिक सिडको चाणक्यनगरात) हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटलेय की, अकोला येथे डाबकी पोलिस ठाण्यात कार्यरत सहायक पोलिस निरीक्षक किशोर वानखेडे (रा.अमळनेर) यांच्यासोबत सन २०११ मध्ये लग्न झाले होते. लग्नाच्या वेळी योगिताच्या कुटुंबीयांनी ८ लाख २५ हजार रुपये हुंडा व लग्न असा एकूण १५ लाखांचा खर्च केला. लग्नानंतर पतीची बदली पुणे, नाशिक, बुलडाणा अशा ठिकाणी झाली. दरम्यानच्या काळात योगिता यांना दोन अपत्य झाली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून माहेरहून १५ लाख रुपये आणण्यासाठी छळ सुरू केला होता. तसेच जिवे मारण्याची धमकी द्यायचा.