पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बस स्थानका मागील भागत राहत असलेले चर्मकार समाज बांधवांना माता रमाई आवास व पी.एम. आवास योजनेपासून वंचित आहे. समाज बांधवांना घरकुल योजना मंजूर करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष गोवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा मुख्य प्रशासक शोभा बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले.
शहरातील बस स्थानका मागील भागत राहत असलेले चर्मकार समाज बांधवांना माता रमाई आवास व पी.एम. आवास योजनेपासून वंचित आहे. गेल्या ४० वर्षांपासून राहत असलेला हा समाज शासकीय योजनेपासून वंचित आहे. नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी चर्मकार समाजाकडे लक्ष देऊन पीएम आवास योजनेमध्ये ६० ते ७० चर्मकार समाज बांधव राहत आहे त्यांना ७ दिवसांच्या आत ऑनलाइन फॉर्म भरून द्यावा व अतिवृष्ठी मध्ये असलेले घराचे पंचनामे झाले असून १६ लोकांना तत्काल घरकुल मंजुर करून द्यावे, शासकीय योजनेत आम्हाला कोणत्याच सुविधा मिळत नाही.
अशा विविध मागण्यांसंदर्भात “जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष गोवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा मुख्य प्रशासक शोभा बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देते प्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष गोवर्धन जाधव, कौशल्या गायकवाड, लता गोवर्धन जाधव, निर्मला पवार, रंभा पवार, शारदा खरे, मिना जाधव, जानकाबाई जाधव, सिताबाई पवार, वैशाली कोळी, संगिता पवार, सुनिता खंडु जाधव, पुजा खरे, केसरबाई जाधव सह मोठ्या संख्येने चर्मकार समाज भगिनी उपस्थित होत्या.