घराला ट्रॅक्टर धडकले ; मुलाच्या अविचाराने आईचा मृत्यू

 

रावेर  : प्रतिनिधी । ट्रॉली नसलेले ट्रॅक्टरचे धूड अविचाराने चालवत स्वतःच्याच घराला त्याची धडक लागल्याने ट्रॅक्टर चालकाच्या आईचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री  रावेर  शहरात घडली .

 

 

गोरेलाल रंधवे (भिलाला, वय ३९,  व्यवसाय –  मजुरी रा.स्वास्तिक टाकीजच्या  मागे,ब-हाणपुर रोड,रावेर )  यांनी रावेर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार  आरोपी  संजय महेताब रंधवे (भिलाला )  हा  सोमवारी रात्री ट्रॅक्टर चालवत होता रात्री  ९ . ३० वाजेच्या सुमारास  सोनु पाटीलनगरमधील आरोपीच्या  घराजवळ आल्यावर आपल्याच  घराचे छताला धडक दिल्याने घराचे छतावरील पत्रे व दगडे खाली पडले  त्याखाली रुमलीबाई महेताब रंधवे व महेताब गुलाबसिंग रंधवे दबले गेले त्यात   रुमलीबाई जागीच मयत झाली  घराच्या नुकसानीस व  महेताब यांच्या दुखापतीस  व रुमलीबाई हिचे मरणास कारणीभुत झाला म्हणुन  चालकाविरोधात रावेर पोलीस ठाण्यात  भादवि कलम ३०४ , २७९ , ३३७ ,३३८ ४२७  मोटार वाहन कायदा कलम १८४  प्रमाणे.गुन्हा. दाखल करण्यात आला आहे

 

 

पोनि रामदास वाकोडे  , सपोनि शितलकुमार नाईक , पोउनि मनोहर जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला . पुढील तपस पो ना निलेश चौधरी

व  सपोनि शितलकुमार नाईक  करीत आहेत .

Protected Content