कत्तलीसाठी गोवंश जनावरे आणणार्‍यांच्या विरूध्द गुन्हे दाखल !

भुसावळ प्रतिनिधी | कत्तलीसाठी गोवंश जनावरे आणल्याप्रकरणी येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनला सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त खालील पोलीस कर्मचारी श्रीकृष्ण खंडेराव देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फिर्यादीनुसार दिनांक १८ रोजी रात्री पेट्रोलिंग गस्त करीत असतांना साडेआठ वाजेच्या सुमारास गैसिया नगर खडका रोड, पापा नगर भागातील रहिवाशी सैय्यद निहाल सैय्यद जहिर, चॉंद शहा हुसेन शहा, मोहम्मद आबिद अब्दुल सत्तर; मुसा फकिरा पिंजारी; अल्लाउद्दीन शेख शिरोद्दीन; अरीफखान शकियार खान; शेख रफिक शेख कालू सर्व राहणार भुसावळ यांनी प्रत्येकी एक गोवंशीय जनावरे आपल्या घराच्या वरांड्यात कंपाऊंड मध्ये घराच्या पाठीमागे असलेल्या रोडमध्ये अरुंद जागेत दोरांनी बांधून ताब्यात ठेवलेले मिळून आले.

सदरची जनावरे गोवंश जनावरे कशासाठी आणले आहेत याबाबत विचारणा केली असता त्यांनी सदरची जनावरे ही कत्तलीसाठी आणल्याचे सांगितले. त्यावरून सदरची गोवंशीय जनावरे बकरी ईद सणाच्या पाश्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने कत्तलीसाठी बंदी घातलेला असतांना देखील ताब्यात बाळगल्याची खात्री झाल्याने एकूण ७ गोवंश जनावरे ३६,५०० रुपयांची ही ८:३० वाजेच्या दरम्यान मिळून आल्याने या सात जणांविरुद्ध गुरनं ०३२९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९९५ भा.द. वि. कलम ५(ब), ९, ११ (१)(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, यासोबत शेख नदीम शेख निजाम; शेख रईस शेख मुक्तार; सादिक खान बशीर खान, शेख मस्तफा शेख हकीम, बशीर शब्बीर पटेल, शेख इम्रान शेख बिस्मिल्ला, शेख रिजवान शेख निसार, मजदूल हक गुलाम दस्तगिर, शेख लुकमान शेख नूर, अकबर बशीर खान, हाजी रईस पहिलवान, अफाक मोहम्मद इब्राहिम, शेख मुक्तार शेख; फिरोज खान मजिद खान या १४ जणांनी जनावरे घराचे बाहेर तसेच ताब्यात असलेल्या इसमांची एकूण २१ गोवंश जनावरे मिळून आली आहेत. त्यांच्या मालकांना नोटीस देण्यात आली आहे. तसेच ईद नंतर ही सर्व जनावरे तपासणी करून कत्तल केल्यास पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरिक्षक दिलीप भागवत यांच्या आदेशावरून सपोनि अनिल मोरे, मंगेश गोंटला, गणेश धुमाळ, कृष्णा भोये, पोकॉ योगेश माळी, कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव यांच्या पथकाने केली.

Protected Content