सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा येथून जवळ असलेल्या चिनावल गावात राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आले आहे. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील चिनावल गावात (वय-३३) महिलाही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गावातील एका भागात राहणारे ही महिला घरात एकटी असताना गावात राहणारा उमर मेहबूब मन्यार याने महिलेचा पाय पकडून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने आरडाओरड सुरू केली. तेवढ्यात संशयित आरोपी उमेद याने दरवाजा उघडून गल्लीतून पळून गेला. याने आठ दिवसांपूर्वी देखील महिलेचा पाठलाग करून हाताने बोलण्याचा इशारा केला होता. भेदरलेल्या अवस्थेत महिलेने सावदा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.