जळगाव प्रतिनिधी । आईचा फोन आला म्हणून रूमचा दरवाजा ढकलून बोलण्यासाठी रूमच्या बाहेर गेला. हीच संधी साधत चोरट्याने चार्जिंगला लावलेला २५ हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप लंपास केल्याची घटना 21 मार्च रोजी रामदास कॉलनीत घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, पवन काळूसिंग पाटील (वय 20) हा शिक्षण घेत असून तो रामदास कॉलनी मध्ये रूम वर भाड्याने राहतो. 21 मार्चला रात्री 9.5 वाजेच्या सुमारास पवनला त्याच्या आईचा फोन आला. तो आईसोबत बोलण्यासाठी रूमचा दरवाजा ढकलून तो बाहेर बोलण्यासाठी निघून गेला. तो काही अंतरापर्यंत आला असता त्याला रूमचा दरवाजा उघडा असल्याचे लक्षात आले. त्याने मित्र रोशन याला फोन लावीत रूम मध्ये लॅपटॉप चार्जिंगला लावला आहे ते आहे की नाही हे बघण्यास सांगितले. रोशन त्याच्या रूम मध्ये जाऊन बघितले असता त्याठिकाणी त्याला लॅपटॉप दिसून आला नाही. त्याने याबाबतची माहिती पवनला देताच पवन काही मिनिटातच रूम वर आला. त्याने रूम मध्ये लॅपटॉपचा शोध घेतला परंतु त्याला लॅपटॉप मिळून न आल्याने त्याला तो चोरी झाल्याची खात्री झाली. त्यांनी 26 मार्चला पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्याच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उषा सोनवणे या करीत आहे.