जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील खंडेराव नगर येथे पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या एका घराची चक्क भिंत फोडून चोरट्यांनी घरातील स्टीलच्या डब्याचे झाकण, लोखंडी पत्रे, लोखंडी प्लेट असा एकूण ३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार, २० जुलै रोजी रामानंदनगर पोलिसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडेराव नगरात पाण्याच्या टाकीच्याजवळ सपना हरी मोरे वय ४० या वास्तव्यास आहेत. १६ जुलै ते २० जुलै दरम्यान त्याच्या घराची भिंत फोडून घरातील ३०० रुपयांचे डब्याचे झाकण, ३ हजार रुपयांचे ६ लोखंडी पत्रे, ४०० रुपयांच्या ४ लोखंडी प्लेट असा एकूण ३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेल्याचे समोर आले. याप्रकरणी सपना मोरे यांच्या तक्रारीवरुन बुधवारी रामानंदनगर पोलिसात नसरीन खान नासीर खान, अप्पू नासीर खान, अज्जू नासीर खान रा. खंडेराव नगर या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे हे करीत आहेत.