घरफोडीतील दोन्ही गुन्हेगारांना 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

0court 383

जळगाव प्रतिनिधी । शहरातील महाबळ तसेच आदर्शनगरात घरफोडी करुन लाखांचा ऐवज लांबविणार्‍या मोहनसिंग जगदिशसिंग बावरी वय-18 व सोनुसिंग जगदीशसिंग बावरी वय – 22 दोन्ही रा. शिरसोली नाका, तांबापुरा, या दोघा भावंडांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. दोघांना आज जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 13 फेब्रुवारीपर्यंत दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

शहरात 24 ब श्रीनगर, महाबळ येथे उदय प्रल्हाद थोरात वय – 24 यांचे 6 जून रोजी बंद घराचे दरवाजाचे कडीकोंडा व कुलुप तोडुन आत प्रवेश करुन घरातील लोखंडी कपाटात एकूण 3 लाख 58 हजार 650 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागीने घरफोडी करुन चोरुन नेले होते. या घटनेनंतर 15 दिवसांनी आदर्शनगरातील नसिम हमीद तडवी वय -52 यांचे बंद घर लक्ष्य करुन दीड लाखांचे दागिणे चोरुन नेले होते. दोन्ही घटनांप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहेत. यात रामानंदनगर पोलिसांनी थोरात यांच्याकडील घरफोडीच्या गुन्हयात दोघांना ताब्यात घेतले आहेत. त्याच्याकडून दागिण्यांचा ऐवजही हस्तगत करण्यात आला आहे. सोमवारी रामानंदनगर पोलिसांनी सोनूसिंग व मोनुसिंग बावरी या दोघा संशयितांना न्या. शेख यांच्या न्यायालयात हजर केले. न्या. शेख यांनी दोघांना 13 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. स्वाती निकम यांनी काम पाहिले.

Protected Content