ग्रामीण महाराष्ट्रात कोरोना प्रसार वेगात ; रुग्ण संख्या २८ टक्क्यांवर

 

मुंबई , वृत्तसंस्था । पुरेशा आरोग्य सुविधा नसलेल्या ग्रामीण आणि निम शहरी भागात करोनाचा प्रसार वेगाने होत आहे. बहुतांश मृत्यू आणि २८ टक्के कोरोनारुग्ण सध्या गावांमध्ये आणि निम शहरी भागात सापडत आहेत. शुक्रवारपर्यंतच्या ७.३ लाख केसेसपैकी २ लाख केसेस खेड्यांमधील आणि तालुक्यातील आहेत. उर्वरित ५.३ लाख केसेस २७ महापालिका क्षेत्रातील आहेत.

मृतांपैकी २३ टक्के म्हणजेच ५ हजार ५०० मृत्यू ग्रामीण भागातील आहेत. १७ हजार ९४४ मृत्यू महापालिका क्षेत्रातील आहेत. बीड, उस्मानाबाद, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव आणि इतर जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रचंड कहर आहे.

कोल्हापुरात महापालिका हद्दीच्या तुलनेत ग्रामीण भागात दुप्पट केसेस आहेत. या जिल्ह्यात १०२४ पैकी ८४१ खेड्यांमध्ये सध्या करोनाचे रुग्ण आहेत. ग्रामीण भागात करोनाचा प्रसार झाल्यामुळे व्यवस्थापन करणं कठीण आहे वेळेत उपचार देणं, निदान करणं शक्य होत नाही. राज्यात २५ टक्के रुग्ण मृतावस्थेतच रुग्णालयात आणले जात आहेत, कारण काही जणांचा रस्त्यातच मृत्यू होतो.
बीड आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये खाजगी क्षेत्रानेही राज्य सरकारला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉ. अभय बंग यांच्या मते, ग्रामीण भागात गंभीर रुग्णांचं प्रमाण वाढणं ही चिंतेची बाब आहे. चाचण्यांची क्षमता अपेक्षेपेक्षा खुपच कमी आहे. त्यामुळेच संसर्ग आणि मृत्यू दोन्हीमध्ये वाढ आहे, स्थानिक ठिकाणी अनेक मृत्यूंची नोंदही केली जात नाही. देशातील ६० ते ७० टक्के जनता ग्रामीण भागात राहते. त्यामुळे स्क्रीनिंगसाठी ग्रामीण भागात तातडीने व्यवस्था कार्यरत करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले.

अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे मृत्यू वाढत असल्याचं सरकारला मान्य नाही. महाराष्ट्रातील मृत्यू दर सध्या ३.१८ टक्के आहे

Protected Content