फैजपूर, प्रतिनिधी । जिल्हा परिषदेचे ग्रामीण रुग्णालयातील अडीअडचणी या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समोर येत आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयाच्या काही अडीअडचणी असल्यास तात्काळ आपण माझ्याशी संपर्क साधा असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांना शिक्षण, क्रिडा व आरोग्य सभापती रवींद्र पाटील भेट देऊन समस्या जाणून घेत आहे. आज शुक्रावार रोजी हिंगोणा येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. याठिकाणी ग्रामीण रुग्णालयाच्या समस्या तेथील डॉक्टर व सामाजिक कार्यकर्ते अतुल भालेराव यांच्याकडून जाणून घेतल्या. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी ग्रामीण भागातील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय व कर्मचारी हे अथक प्रयत्न करीत आहेत. त्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना कोरोनाचे सुरक्षा किट आम्हाला सुद्धा मिळावे ही विनंती केली. यावर त्यांनी सांगितले, जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी असणारे कोरोना किट लवकर मिळवून देण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांच्या कडे करणार असल्याचे रविंद्र पाटील यांनी हिंगोणा येथील ग्रामीण रुग्णालयाला दिलेल्या भेटीत सांगितले.