जळगाव, प्रतिनिधी | जिल्ह्यात विविध कारणांमुळे अपात्र ठरलेल्या सदस्यांच्या रिक्त झालेल्या जागांसाठी उद्याला ओबीसी जागा वगळून ५० मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील १६२ ग्रा.पं. अंतर्गत विविध कारणांमुळे २२९ ग्रा.पं. सदस्यांची पदे रिक्त आहेत. या रिक्त जागांसाठी ३१३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी वैध अवैध छाननीअंती तसेच ७५ उमेदवारांनी माघारी घेतल्यानंतर १८२ उमेदवारांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. यात ओबीसी उमेदवारी अर्ज व जागा वगळता पोटनिवडणुकीसाठी ५० मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येत आहे. या पोटनिवडणुकीसाठी सकाळी ७:३० ते ५:३० दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. १६२ ग्रा.पं अंतर्गत जामनेर २, एरंडोल २, धरणगाव २, पारोळा ३, भुसावळ २, बोदवड १, मुक्ताईनगर १, यावल ४, रावेर ३, पाचोरा १०, भडगाव ३, चाळीसगाव ४, अमळनेर १ आणि चोपडा ५ अशा ५० मतदान केंद्रांवर सरासरी २२५ निवडणूक केंद्र मतदान अधिकारी, सहायक , मदतीस असे कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.