यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या ९ सार्वत्रिक आणि ४ पोटनिवडणूकीचा आज निकाल जाहीर करण्यात येत आहे. निवडणूक निर्णय अधिकारीर तथा तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरूवात करण्यात आली.
यावल तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या ९सार्वत्रिक व ४ पोट निवडणुकीचे मतदान शांततेच्या वातावरणात संपन्न होवुन, या सार्वत्रिक निवडणुकी पुरूष २४११ आणी महिला२६०६ असे५१०६ मतदारांनी मतदान केले ८१.३२ टक्के मतदान झाले तर चार ठीकाणच्या पोटनिवडणुकीत ३३१o मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीनंतर यावल तालुक्याचे लक्ष वेधणाऱ्या अत्यंत चुरसीच्या साकळी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सरपंचपदाच्या चौरंगी निवडणुकीत दिपक नागो पाटील हे २५६४ मतांनी विजयी झाले असुन त्यांचे प्रतिस्पर्धी किरण मधुकर महाजन यांनी १६११ मिळवले असुन त्यांचा या सरपंचपदाच्या निवडणुकीत ९५३ मतांनी पराभव झाला आहे. , सरपंचपदासाठी विजयी झालेले दिपक नागो पाटील त्यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय पॅनलचे १७ पैक्की१४ ग्रामपंचायत सदस्यांनी देखील आपले दणदणीत विजयी संपादन केले आहे ,निवडणुकीत विजयी झालेल्या सरपंच उमेदवारांचा साकळी ग्रामस्थांनी फटाक्यांच्या फटाक्यांच्या आतिषबाजी करून जल्लोष केला . निवडणुकीचा निकाल जाणुन घेण्यासाठी सातोद रोड वरील तहसीलच्या नवीन प्रशासकिय ईमारती समोर तालुक्यातील ग्रामस्थांची मोठी गदी पहावयास मिळत आहे .या ठीकाणी पोलिस उपअधिक्षक डॉ कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवला आहे .