पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलिस प्रशासनाची दिशाभूल करत १६ मार्च रोजी पहाटे तीन वाजता जळगाव येथील रेडक्रास सोसायटी समोरील सन – १९८३ पासून स्थापन असलेल्या तथागत गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे हटवण्याचे षडयंत्र केले गेले. ह्या गैरकृत्यामुळे सर्व आंबेडकर जनतेच्या भावना अत्यंत तीव्र दुखावल्या असून पाचोरा येथील महामानव सन्मान समितीतर्फे दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी अशा आषयाचे निवेदन पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आले.
सदरचे निवेदन सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे व ठाणे अंमलदार सुर्यकांत नाईक यांनी स्विकारले. निवेदन देते प्रसंगी बामसेफचे जय वाघ, सामाजिक कार्यकर्ते खलिल देशमुख, अनिल लोंढे, प्रविण ब्राम्हणे, अॅड. अंकुश कटारे, जगन निकम, शामकांत खैरे, रणजीत तडवी, संतोष कदम, योगेश निकम, नितीन सोनवणे, अमोल म्हस्के, सागर पवार, किरण अहिरे, गौतम पवार, अबजल तडवी, संजीवनी रत्नपारखी, विकास सोनवणे सह मोठ्या संख्येने महामानव सन्मान समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे हटविणे ही बाब अत्यंत गंभीर असून पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याने दोषींवर कलम १२० (ब) ही लावण्यात यावे. ही घटना दिनांक १६ मार्च रोजी घडली असुन आज रोजी १० दिवस उलटूनही जळगाव पोलिस दोषींना पकडू शकले नाहीत ही बाब अत्यंत खेदजनक असून गंभीर आहे. याबाबत विधान परिषदेत दोन वेळा चर्चा होवून व उपसभापतींनी आदेश देवून सुध्दा पोलीस यंत्रणा दोषींना पकडू शकत नाही. यामुळे आमच्या सारख्या सामान्य लोकांना काय न्याय मिळेल ? असा प्रश्न उभा राहतो आणि जनतेच्या भावना संविधानाच्या चौकटीत तीव्र दुखावल्या असून आपल्या स्थरावरुन दोषींना अटक करत आम्हाला न्याय द्यावा अन्यथा महामानव सन्मान समितीतर्फे कायदेशीर पध्दतीने आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन महामानव सन्मान समितीतर्फे पाचोरा पोलिस स्टेशनला देण्यात आले आहे.