गो.से. हायस्कूल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

पाचोरा, प्रतिनिधी । प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे  प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वासुदेव महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण केले.

याप्रसंगी श्री. गो. से. हायस्कूल चे शालेय समिती तांत्रिक विभागाचे चेअमन तथा न.पा. बांधकाम समितीचे सभापती नगरसेवक वासुदेव महाजन, शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख, माजी मुख्याध्यापक एस टी. अहिरे, एस.एस. पवार, सेवानिवृत्त पर्यवेक्षक शांताराम चौधरी, पी. जे. पाटील, ए. जे. महाजन, निवृत्त ग्रंथपाल श्रीपाद कुलकर्णी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. पाटील, ए. बी. अहिरे व  तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर व कार्यालय अधिक्षक अजय सिनकर तसेच सकाळ, दुपार सत्रातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते. सुरुवातीलाच पर्यवेक्षक ए. बी. अहिरे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. वासुदेव महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. व शेवटी “माझी वसुंधरा” या अभियानांतर्गत सर्व उपस्थितांनी शपथ घेतली कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

Protected Content