यावल प्रतिनिधी । येथील खडकाई नदीच्या पात्रात गोवंशाचे चामडे भरत असणार्या दोन ट्रकला पोलिसांनी जप्त केले असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की यावल शहरालगत असलेल्या खडकाई नदीच्या पात्रात नगर परिषद जवळ आज दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ट्रक क्रमांक डबल्यु बी .११डी३६८६व एमएच १९ झेड०९३४या वाहनातुन गोवंश जातीचे चामडे आयात निर्यात करतांना दिसुन आले. पोलीसांना गुप्त माहीती मिळाल्याने त्यांनी तात्काळ पोलीसांनी घटनेच्या ठिकाणी येवुन पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार, वरिष्ठ पोलीस उपनिरिक्षक अजमल रवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुशिल घुगे,असलम खान, विजय वाढे , राहुल चौधरी , निलेश वाघ यांच्या पथकाने कारवाई केली.
या पथकाला नदीच्या पात्रात दिवसाढवळ्या गोवंश जातीच्या चामड्याल वाहून नेणार्या दोघ ट्रकचालकांना चौकशी कामी ताब्यात घेतले आहे .सदरच्या ट्रकमध्ये भरलेले सुमारे पाच लाख रूपये किमतीचे चामडे हे पोलीसांनी नगर परिषदचे स्वच्छता आधिकारी शिवानंद कानडे व कर्मचारी यांच्या सह्यायाने व पशुवैद्यकीय चिकित्सक यांनी तपासणी करून सदरच्या चामडयांचे नमुने पुढील तपासणीसाठी घेतले आहेत. सदरच्या ट्रकमध्ये भरलेले चामडे हे डंपींग ग्राऊंडवर जेसीबी यंत्रणेच्या माध्यमातुन मोठे खड्डे खोदुन त्यात पुरविण्यात आले असुन या प्रकरणात पोलीसांनी दोघ ट्रकासह दोन जणांना चौकशी कामी ताब्यात घेतले आहे.