जळगाव प्रतिनिधी । गोल्ड सिटी हॉस्पीटलमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाची अतिशय काळजीपूर्वक तपासणी करून त्याला जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. संबंधीत हॉस्पीटलच्या तत्परतेचे प्रशासनाने कौतुक केले असून आम्ही भविष्यातही याच तडफेने रूग्णसेवेत कार्यरत राहणार असल्याचे प्रतिपादन याचे संचालक डॉ. विकास बोरोले यांनी केले आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील दुसरा कोरोना पॉझिटीव्ह रूग्णावर पहिल्यांदा शहरातील गोल्ड सिटी रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. येथील तज्ज्ञांनी कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर संबंधीत रूग्णाला जिल्हा रूग्णालयात पाठविले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, कोरोना पॉझिटीव्ह रूग्णावर उपचार केल्यामुळे गोल्ड सिटी रूग्णालयास सील करण्यात येणार असल्याची आवई काही जणांनी उठविली. या संदर्भात गोल्ड सिटी हॉस्पीटलचे संचालक डॉ. विकास बोरोले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, हॉस्पीटलने आपत्कालीन अवस्थेत रूग्णसेवेचे वसा सोडलेला नाही. आम्ही या आपत्तीच्या स्थितीतही रूग्णांची सेवा करत आहोत.
हे देखील वाचा : जळगावात कोरोनाचा दुसरा रूग्ण पॉझिटीव्ह
डॉ. विकास बोरोले म्हणाले की, २९ मार्च रोजी मध्यरात्रीनंतर साडेबाराच्या सुमारास ६१ वर्षाचा व्यक्ती गोल्ड सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. त्याला श्वसनाचा त्रास जाणवत होता. सध्या सुरू असणार्या कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे आमच्या तज्ज्ञांनी त्याची गेटवरच पूर्णपणे काळजी घेऊन चाचणी केली. त्यांनी लागलीच संबंधीत रूग्णाला जिल्हा रूग्णालात जाण्याचे सुचविले. दरम्यान, त्या रूग्णाने गोल्ड सिटी हॉस्पीटलमधील प्रसाधनगृहाचा वापर केला. तो येथून बाहेर आल्यानंतर सोबतच्या लोकांसोबत जिल्हा रूग्णालयाकडे निघून गेला. दरम्यान, गोल्ड सिटी हॉस्पीटलच्या आरएमओसह अन्य कर्मचार्यांनी हा परिसर काळजीपुर्वक निर्जंतूक केला. तर तपासणी करतांना आरएमओरसह सर्व कर्मचार्यांनी रेनकोट, ट्रिपल लेअर मास्क, गॉगल, कॅप, गम बुट, ग्लोव्हज आणि सॅनिटायझरचा उपयोग केला होता. संबंधीत रूग्णाची तपासणी केल्यानंतर काही मिनिटांमध्येच तो रूग्ण निघून गेला. या कालावधीत रूग्णालयाचे तज्ज्ञ आणि कर्मचार्यांनी सोशल डिस्टन्सींग पाळत काळजीपूर्वक तपासणी केली. या सर्व घटनाक्रमाचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे. जिल्हा रूग्णालयाने ठरवून दिल्यानुसार जर आवश्यकता असेल तर संबंधीत कर्मचार्यांचे होम क्वॉरंटाईन करण्यात येईल. मात्र जेव्हा रूग्णसेवेची आवश्यकता आहे तेव्हा गोल्ड सिटी हॉस्पीटलने कर्तव्याचे पालन करून रूग्णसेवा सुरू ठेवली आहे. लॉकडाऊनच्या उर्वरित कालावधीतही आम्ही याच तत्परतेने सेवेसाठी उपलब्ध असल्याचे डॉ. विकास बोरोले म्हणाले. दरम्यान, या घटनाक्रमाबाबत आपण जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांसोबत चर्चा केली असून त्यांनी आमच्या प्रयत्नांचे कौतुक करत हॉस्पीटल सुरू ठेवण्याचे निर्देश दिल्याची माहितीदेखील डॉ. बोरोले यांनी याप्रसंगी दिली.
हे देखील वाचा : लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करा- जिल्हाधिकारी
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००