गोलाणी मार्केट परिसरातून एकाची दुचाकी लांबविली; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील गोलाणी मार्केट येथील साई सागर दुकानासमोरून एकाचे २५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्याने चोरून नेले. यासंदर्भात शुक्रवार २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बंटी साजनदास कुकरेजा (वय-२४) रा. सिंधी कॉलनी, जळगाव यांचे गोलाणी मार्केट येथील साई सागर नावाचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता दुचाकी (एमएच १९ सीएच १३४१) ने जळगाव शहरातील गोलाणी मार्केट येथे आले. त्यावेळी त्यांनी दुचाकी पार्किंग करून लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्याने 25 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. या संदर्भात बंटी कुकरेजा यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवार २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता अज्ञात चोरट्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजकुमार चव्हाण करीत आहे.

Protected Content