जळगाव प्रतिनिधी । मध्यवर्ती शहरातील गोलाणी मार्केटमधील दुकानासमोरून मोबाईल दुकानदाराची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी की, वाजिद शे. रफिक (वय-३२) रा. मासुमवाडी जळगाव यांचे शहरातील गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल रिपेअरींगचे दुकान आहे. ९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ते दुकानावर दुचाकी (एमएच १९ एझेड ८४०३) ने आले. दुकानसमोरील पार्किंगच्या ठिकाणी दुचाकी पार्क करून लावली. दुपारी २ वाजेच्या सुमारास दुचाकी जागेवर दिसून आली नाही. परिसरातील इतरत्र भाग पिंजून काढला मात्र दुचाकी मिळून आली नाही. वाजिद शेख यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भास्कर ठाकरे करीत आहे.