गोरखपूर तांडा येथील तरूण डोंगरी नदीत बेपत्ता; शोधकार्य सुरू

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील गोरखपूर तांडा येथील २५ वर्षीय तरूण हा शेतात जात असतांना डोंगरी नदीत वाहून गेल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. बेपत्ता झालेल्या तरूणाचा शोध कार्य प्रशासनाकडून केले जात आहे.

याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील गोरखपूर तांडा येथील सोमनाथ रामजी राठोड (वय- २५) हा तरूण सकाळी सुमारास शेतात गेलेला असताना गावालगत असलेल्या डोंगरी नदीच्या पात्रात वाहून गेल्याची घटना आज बुधवारी २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सोमनाथ रामजी राठोड या तरूणाचा तपास ग्रामस्थांकडून सकाळपासून सुरू आहेत. मात्र त्याचा थांग कुठेच लागलेला नाही. बेपत्ता झालेल्या तरूणासाठी शोध मोहीम सुरू आहेत.

Protected Content