गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात स्टार्टअपवर व्याख्यान

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाउंडेशन संचालित गोदावरी  इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयात डॉ. राजकुमार कांकरिया यांचा ”Start-up ecosystem in India:Budding students Entrepreneurs Perspective” या विषयावर एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

सेमिनारच्या  सुरवातीस महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिले. यावेळी डॉ. राजकुमार कांकरिया यांनी  विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला व स्टार्टअप काय आहे, सरकारची भूमिका काय आहे, सवलत काय उपलब्ध आहे आदींवर मार्गदर्शन केले. नोकरीच्या मागे न धावता तुमच्या जवळ काही Business Idea असतील तर तुम्ही ते साध्य करू शकतात. यावेळी त्यांनी OLA, PayTM, Make my Trip इत्यादी स्टार्टअपचे उदाहरण विद्यार्थ्यांना दिले. सदर सेमिनारला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सूत्रसंचालन साक्षी नेवे व आभार अश्विनी सोनवणे या विद्यार्थिनींनी मानले.  सेमिनारचे कामकाज प्रा. आफ्रिन खान यांनी पाहिले. यावेळी महाविद्यालयाच्या डॉ. नीलिमा वारके यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.

Protected Content