Home Cities जळगाव गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात सरोजिनी नायडूंना आदरांजली

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात सरोजिनी नायडूंना आदरांजली


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात सरोजिनी नायडू यांना आदरांजली वाहून रेडिओ डे साजरा करण्यात आला.

जळगाव येथील गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (MBA) जळगाव महाविद्यालयात कवयित्री व स्वातंत्र सेनानी सरोजिनी नायडू यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. तसेच रेडिओ डे सुद्दा साजरा करण्यात आला. प्रथम वर्षातील विद्यार्थी दिव्या तळेकर हिने सरोजिनी नायडू यांच्या जीवनावर व त्यांच्या कार्याविषयी महिती दिली. यावेळी मनोरंजनाचे साधन समजले जाणाऱ्या रेडिओ विषयी सुद्धा माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना मोहरकर या विद्यार्थिनीने केले. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. श्रुतिका नेवे यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली

यावेळी महाविद्यालयाचे डॉ. नीलिमा वारके, प्रा. मकरंद गोडबोले, प्रा. प्राजक्ता पाटील, प्रा. चेतन सरोदे, डॉ. अनुभूती शिंदे, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. आफ्रिन खान, प्रा. अश्विनी सोनवणे, प्रा. श्रुतिका नेवे, प्रा.चारुशीला चौधरी, प्रा. मिताली शिंदे, प्रा. प्रिया फालक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound