गोदावरी लक्ष्मी को-ऑप. बँकेतर्फे सभासदांना ९ टक्के लाभांश जाहीर (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।जळगाव येथील गोदावरी लक्ष्मी कॉपरेटिव बँकेतर्फे  सभासदांना यंदा ९ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला असल्याची घोषणा चेअरमन डॉक्टर उल्हास पाटील यांनी केली.

 

गोदावरी लक्ष्मी को-ऑपरेटिव बँकेची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात उत्साह पूर्ण वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी खा. डॉ. उल्हास पाटील हे होते.

तर व्यासपीठावर संचालक सुरेश झोपे, संगीता चौधरी, आशा तळेले, राजेंद्र कुरकुरे, राजेंद्र महाजन, डॉ. संपत वानखेडे, राजेंद्र पाटील, चंद्रकुमार चौधरी, डॉ. चंद्रसिंग पवार, लीलाधर चौधरी, सुनील महाले, हरीश फालक, श्रीमती गोदावरी पाटील, डॉ. वर्षा पाटील, सुभाष पाटील आदी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला संचालक राजेंद्र कुरकुरे यांनी श्रध्दांजली ठराव मांडला.त्यानंतर बॅंकेचे कार्यकारी संचालक अशोक महाजन यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सभेत विषय पत्रिकेवरील १० विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.

 

सभासदांच्या विश्वासाच्या बळावर बॅंकेची रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल- डॉ. उल्हास पाटील

गत २२ वर्षापासुन गोदावरी लक्ष्मी सहकारी बॅंक हि सहकार क्षेत्रात कार्यरत आहे. या बॅंकेची मुहुर्तमेढ रोवण्यासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांचे कार्य अतुलनीय आहे. स्थापनेपासुन सभासदांच्या विश्वासाच्या बळावर गोदावरी बॅंक आता रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांनी केले. डॉ. उल्हास पाटील पुढे म्हणाले कि, केंद्र, रिजर्व्ह बॅंक आणि सहकार कायद्याच्या अनुषंगाने आपल्यावर अनेक बंधने आहेत. तुम्हि ठेवलेल्या पैशांचे आम्हि फक्त काळजीवाहु आहोत. २२ वर्षापासुन संचालक मंडळाच्या सहकार्याने बॅंक प्रगती करीत आहे. तसेच बॅंकेचे कर्मचारी देखिल तांत्रिकदृष्ट्या प्रगत आहेत. रिजर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार स्वनिधी १२% असणे आवश्यक आहे. आपल्या बॅंकेचा स्वनिधी तब्बल २२% म्हणजेच १५ कोटिपर्यंत पोहोचला असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. बॅंकेच्या ठेवी ९१ कोटी असुन कर्ज वाटप ६२ कोटी इतके आहे. गोदावरी बॅंकेने देशविकासातहि ६७ लाख रुपये आयकर भरुन योगदान दिले आहे. बॅंकेला ४ कोटी  २९ लाखांचा ढोबळ नफा व निव्वळ नफा १ कोटी ४ लाख रुपये झाला आहे. बॅंकेच्या पाचहि शाखा संगणकियदृष्ट्या कनेक्टेड असुन ‘क्यु’ आर कोडचीहि सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. बॅंकेला वैधानिक लेखापरिक्षणात सातत्याने ‘अ’ वर्ग प्राप्त झाला आहे. बॅंकेतर्फे सभासदांच्या पाल्यांचाहि सत्कार करण्यात येतो. विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्यासाठी क्रिएटिव्हिटी आणि नवनिर्मितीचा ध्यास घ्यावा असा कानमंत्रहि चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांनी पाल्यांना दिला.

 

२४ सभासद पाल्यांचा सत्कार

गोदावरी लक्ष्मी सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २४ सभासद पाल्यांचा चेअरमन डॉक्टर उल्हास पाटील यांच्यासह मान्यवर संचालक मंडळाच्या हस्ते   आणि पीएचडी पदवीधारक यांचा सन्मान करण्यात आला. सत्कार समारंभाचे वाचन बॅंकेच्या वरीष्ट अधिकारी राजश्री महाजन यांनी केले. सभेचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन बॅंकेचे कार्यकारी संचालक अशोक महाजन यांनी केले. तर आभार बॅंकेच्या संचालिका आशा तळेले यांनी मानले. सभेच्या यशस्वीतेसाठी बॅंकेचे अधिकारी, कर्मचारी व स्टाफने परिश्रम घेतले. राष्ट्रागीताने सभेचा समारोप करण्यात आला.

Protected Content