गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमधील मानसिक आरोग्य नर्सिंग विभागाच्यावतीने जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन-२०२२ निमित्त आत्महत्या प्रतिबंधावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यंदाच्या वर्षी कृतीतून आशा निर्माण करणे, अशी संकल्पना होती, त्यादृष्टीने कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सर्व पाहुण्यांचे स्वागत आणि सत्काराने करण्यात आली.

यावेळी गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य मेनका एस.पी. यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विजयश्री मयूर मुठे (एमडी मानसोपचारतज्ज्ञ) ह्या उपस्थीत होत्या. त्यांनी जागतिक आत्महत्या आणि प्रतिबंध या विषयावर थोडक्यात चर्चा करून सुरुवात केली.

यावेळी प्रथम एमएससी नर्सिंग आणि बेसिक बीएससी नर्सिंगचे सर्व विभागीय एचओडी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. मौसमी लेंढे, नर्सिंग संचालक शिवानंद बिरादार, प्रा.अश्विनी के वैद्य (एचओडी आणि एसो. प्रोफेसर) मानसिक आरोग्य नर्सिंग विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. परिचर्या प्रशासक प्रवीण कोल्हे व विभागातील इतर सर्व प्राध्यापक हेमांगी मुरकुटे, नफीस खान, सुमित निर्मल, माधुरी धांडे, अक्षय वानखेडे आणि प्रियांका गाडेकर यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला.

Protected Content