गेल्या २४ तासात कोरोनाचे ३८,९०२ नवे रुग्ण वाढले !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या २४ तासात कोरोनाचे ३८,९०२ नवे रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या २४ तासात ५४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे. मागील २४ तासांत भारतात कोरोनाचे ४०,४२५ नवे रुग्ण आढळले असून ६८१ रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यामुळे देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या ११,१८,०४३ वर पोहोचली असून मृतांचा एकूण आकडा २७,४९७ वर पोहोचला आहे. देशात सद्य घडीला ३,९०,४५९ रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर मागील २४ तासांत ४६,३३६ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ७,००,०८७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या माहितीनुसार, १ कोटी ३७ लाख ९१ हजार ८६९ लोकांची आतापर्यंत कोरोना टेस्ट झाली आहे. १८ जुलैला ३ लाख ५८ हजार १२७ लोकांची कोरोना टेस्ट झाली आहे.

Protected Content