जळगाव प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मिल परिसरात तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. जिल्हा रूग्णालयात मृतदेह आणण्यात आला असून नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश केला.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील राहुल सिध्दार्थ गाढे (वय-२०) रा. गेंदालाल मिल हा आपल्या आईवडील व भाऊ-बहिणीसोबत राहतो, आज सकाळी भाऊ रोहित व वडील सिध्दार्थ गाढे हे कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. तर आई बाहेर गेली होती. त्याचे घर दोन मजली असल्यामुळे राहुल गाढे यांने घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. ही घटना दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. मुलाने आत्महत्या केल्याचे पाहुन आईने हंबरडा फोडत प्रचंड धक्का बसला. यावेळी शेजरच्यांनी तातडीने उतरवून जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. जिल्हा रूग्णालयात मोठी गर्दी जमली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ रविंद्र सोनार करीत आहे.