फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | श्री सतपंथ मंदिराचे अकरावे गादीपती परमपूज्य ब्रह्मलीन गुरूदेव जगन्नाथजी महाराज यांची 21वी पुण्यतिथी यंदा असून त्यानिमित्त त्यांना समरसता महाकुंभात अभिवादन करण्यात येणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील श्री सतपंथ मंदिर संस्थानची स्थापना इ.स. 1600 मध्ये झाली. पहिले गादीपती आचार्य धर्मदासजी महाराज यांनी ज्योत प्रज्वलित केली. त्यानंतर प्रेमानंदजी महाराज, भगतरामजी महाराज, पंडितजी महाराज, अमृतजी महाराज, दगडूजी महाराज, झेंडूजी महाराज, बारसूजी महाराज, धर्माजी महाराज, पुरुषोत्तमजी महाराज आणि जगन्नाथजी महाराज यांनी ही परंपरा अखंडित सुरू ठेवली असून सध्या विद्यमान बारावे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज आहेत. गुरू जगन्नाथजी महाराज असतानाच त्यांनी परंपरेप्रमाणे आधीच उत्तराधिकारी म्हणून जनार्दन हरीजी महाराज यांना नेमले होते. त्यानंतर 2001 मध्ये ते ब्रह्मलीन झाले. तेव्हापासून महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सतपंथ मंदिराचा कारभार निरंतर सुरू आहे. परमपूज्य ब्रह्मलीन गुरूदेव जगन्नाथजी महाराज ब्रह्मलीन होऊन 21 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याचे औचित्य साधून 21 वी पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्याचे कार्य समरसता महाकुंभात करण्यात येणार आहे. यानिमित्ताने गुरूदेव जगन्नाथजी महाराज यांच्या कार्याचा उजाळा करण्यात येणार आहे. गुरूदेव जगन्नाथजी महाराज यांनी आपल्या कार्यकाळात सतपंथाच्या प्रचार आणि प्रसाराचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांचाच वारसा जोपासून त्यांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज सध्या कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली समरसता महाकुंभ आयोजित करण्यात आला असून या महाकुंभात परमपूज्य ब्रह्मलीन गुरूदेव जगन्नाथजी महाराज यांना 21 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात येणार आहे.