Home Uncategorized गुरुवारी कॉंग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांचा पदग्रहण सोहळा

गुरुवारी कॉंग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांचा पदग्रहण सोहळा

0
44

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांचा  गुरुवार दि. २८ ऑक्टोबर रोजी पदग्रहण सोहळा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

 

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार सोनिया सोनिया गांधी, यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी दिनांक ७ ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब प्रदीप पवार यांची नियुक्तीचे आदेश दिले आहेत. नवनिर्वाचित अध्यक्ष यांचा पदग्रहण समारंभ दिनांक २८ ऑक्टोबर गुरुवारी दुपारी २ वाजता काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या समारंभास मावळते अध्यक्ष अॅड. संदीप भैय्यासाहेब पाटील आपला पदभार नवनियुक्त अध्यक्षांना सुपूर्द करणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील , प्रदेश सरचिटणीस विनोद कोळपकर ,तसेच जिल्हा काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, माजी प्रदेश पदाधिकारी , विभागाचे अध्यक्ष व पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे विविध सेलचे अध्यक्ष अधिकारी सर्व तालुक्याचे ब्लॉक अध्यक्ष व तालुका शहर अध्यक्ष, कार्यकर्ते आदी उपस्थित राहणार आहेत.


Protected Content

Play sound