बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील ईसोली येथील एक शिक्षक मागील २३ वर्षांपासून शिस्त लागावी या उद्दात हेतूने विद्यार्थ्यांचे फाटलेले गणवेश शिवून देणे, विद्यार्थ्यांचे वाढलेली नखे कापून देण्याचा उपक्रम राबवीत असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण नीटनेटकेपणा जणू काही विसरत चालला आहे. आणि त्यातच विद्यार्थी जीवनात तर शिक्षणाच्या ओझ्यासोबत आता शालेय जीवनात अनेक गोष्टी कालबाह्य होत चालले आहे. यालाच कुठेतरी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी जपावे याकरिता बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील ईसोली येथे श्री शिवाजी विद्यालयाचे शिक्षक हिरा गवई यांनी एक अभिनव छंद जोपासला आहे .आपल्या शाळेतले विद्यार्थ्यांचे चुकूनही शालेय गणवेशाचे बटन अथवा काही फाटले गणवेश असतील तर लगेच ते आपल्या वर्गातील ड्रॉवर मधून काढून त्याला नीटनेटके स्वतः करून देतात. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांनी वाढलेले नखे देखील ते त्यांच्या जवळ असलेल्या नेलकटरद्वारे काढण्याकरता त्यांना शिकवण देतात. हा त्यांनी त्यांच्या दैनंदिन शिकवण्याच्या जबाबदारी सोबत एक छंद म्हणून मागील 23 वर्षापासून जोपासला आहे .असाच असाच प्रसंग असलेल्या छंदाचा व्हिडिओ सध्या सर्वत्र जिल्ह्यात व्हायरल होत आहे आणि त्याची चर्चाही होत आहे.